बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन

अकोला | ९ मे :

आज बुद्ध पौर्णिमा — वर्षातील सर्वांत पवित्र आणि ऐतिहासिक तिथी.

गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण

Related News

हे तीनही अत्यंत महत्त्वाचे क्षण याच दिवशी घडले,

म्हणून हा दिवस बौद्ध अनुयायांसाठी विशेष पूजनीय मानला जातो.

या पावन दिवसानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे प्रार्थनांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं.

या प्रार्थना कार्यक्रमात शेकडो बौद्ध अनुयायांनी उपस्थिती दर्शवली,

वंदना व बुद्ध वचने ऐकून शांततेचा संदेश घेतला.

वातावरणात बुद्धं शरणं गच्छामि या घोषणांनी एक वेगळंच पावित्र्य अनुभवायला मिळालं.

कार्यक्रमात स्थानिक भिक्खू आणि धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना,

ध्यानधारणा आणि उपदेश झाले. यावेळी अनेक अनुयायांनी पंचशीलाचे पालन करण्याचा संकल्प केला.

Read Also : https://ajinkyabharat.com/buddha-pauranima-for-the-sake-of-mahabodhi-vriksha-12-tas-mahapuja/

Related News