मंगरूळपीर (जि. वाशिम) – खेळत असताना विहिरीत पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (2 फेब्रुवारी 2026) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मंगरूळपीर–वाशिम रोडवरील विद्युत केंद्राजवळील एका वीटभट्टी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या कामगाराची मुलगी कु. सुंदरी धनसिंग सीसोदिया (वय 3, रा. झीर पांजरीया, ता. नेपानगर, जि. बुरहानपूर) ही इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक जवळच असलेल्या विहिरीत पडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मंगरूळपीर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर शाखा यांना तातडीने पाचारण केले. पथकाचे प्रमुख जीवन-रक्षक दिपक सदाफळे यांनी वेळ न दवडता आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले.
Related News
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading
Manoj Jarange Patilची रुग्णालयातून मोठी घोषणा; पुन्हा मुंबईकडे कूच, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजि...
Continue reading
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या उपाययोजना
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
Manoj Jarange Patilना डिफेंडर देणारा भोसले कोण? २ लाखांचा फोन, कंत्राटदार आणि ७५० कोटींच्या कामांवर बारस्करांचे सवालमराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पा...
Continue reading
रुग्णालयांकडून वैद्यकीय वस्तूंवर मोठा नफा? Tukaram Mundhe यांच्या पत्रामुळे खळबळ; काही वस्तूंवर तब्बल २८४१ टक्क्यांपर्यंत फरक
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त Tukaram Mund...
Continue reading
मोठी बातमी! 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अ...
Continue reading
एक सरकार BRICSमध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरा...
Continue reading
DJ विरोधातील भूमिकेवरून विद्यानंद बापट चर्चेत; हिंदू सेवा संघाची हद्दपारीची मागणी
गणेशोत्सवातील DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याच्या मागणीवरून पुण्यातील वातावरण चांगलेच ...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
मोठी बातमी! जरांगेंच्या प्रश्नांवर आज निर्णायक तोडगा? संभाजीनगरात तातडीची बैठक; राज्यभर मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil यांच्या सुरू असलेल्या उप...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
मुंबई : राज्यभरात आ...
Continue reading
गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, अपूर्व चेके, लखन खोडे, शुभम भोपळे, शिवा अडात आणि सिद्ध इंगोले या सदस्यांनी अत्यंत धाडस आणि तत्परता दाखवत बचावकार्य सुरू केले. कठीण परिस्थितीतही त्यांनी अवघ्या एका तासाच्या आत विहिरीत शोधमोहीम राबवून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला.
घटनेची माहिती मिळताच वीटभट्टीवरील कामगार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आपल्या चिमुकलीला गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उपस्थितांचे डोळे पाणावले.
या वेळी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत पंचनामा प्रक्रिया सुरू केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने दाखवलेल्या साहसाचे आणि जलद प्रतिसादाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. वेळेवर मदत मिळाल्याने शोधमोहीम लवकर पूर्ण झाली, असेही नागरिकांनी सांगितले.
ही घटना पुन्हा एकदा उघड्या विहिरी आणि सुरक्षेअभावी लहान मुलांसाठी निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधणारी ठरली आहे. अशा ठिकाणी संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akot-talukyatil-39-grampanchayativar-administrator-raj-future-sarpanchchi-wait-increased/