पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाला ‘मविआ’कडून ब्रेक- नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी

तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर

महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला

Related News

ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीची सरकार आल्यावर ही

योजना सुरु झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

सांगितले. वाशिममध्ये बोलताना त्यांनी मविआ आणि

काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं

आश्वासन देणे हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस

आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे

रोखून धरले होते. पण आमचे सरकार आले आणि ही काम सुरू

केली. वाशिमधून बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणामध्ये

मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने

मतदान करावे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात

त्यांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले. मी संत सेवालाल

महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचे

आशीर्वाद घेतले आहे. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत

आहे. आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जन्म जयंती आहे. गेल्यावर्षी

त्यांची ५०० वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन

करतो.

Read also: https://ajinkyabharat.com/after-the-movement-of-tribal-mlas-the-government-will-stop-conscription-money/

Related News