लाडक्या बहिणींना मोठा धक्का!

लाडकी बहीण

लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती,

मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे.

त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान

Related News

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक

महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज

दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित

मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील,1 सप्टेंबर नंतर अर्ज

करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत.

त्यांना या 3 हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, असे अदिती तटकरे यांनी

नमूद केले. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून

त्यांना लाभ मिळणार आहे,असेही त्यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही

शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी

करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची

घोषण करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी

आत्तापर्यंत राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे र्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक

अर्ज आल्याची महिती समोर आली आहे. सरकारने या योजनेचा पहिला आणि

दुसरा हफ्ता हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या

आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या

खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल,

त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकांऊटशी आधार कार्ड लिंक

केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/price-of-ganesh-idols-increased-by-30-percent-due-to-rain/

Related News