“BoycottOYO: एक चुकीचं पाऊल आणि विरोधाचा आवाज”

"BoycottOYO: एक चुकीचं पाऊल आणि विरोधाचा आवाज"

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज असलेल्या OYO ला सध्या सोशल मीडियावर जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे.

सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर BoycottOYO हा टॉप ट्रेंडिंग विषय बनला आहे.

रितेश अग्रवालच्या नेतृत्वाखालील OYO ने असं काय केलं ज्यामुळे लोक विरोधात बोलत आहेत, ते जाणून घेऊया.

Related News

X (पूर्वीचं ट्विटर) असो की फेसबूक किंवा सोशल मीडियाचा अन्य कोणताही प्लॅटफॉर्म असो , सध्या सगळीकडे BoycottOYO हा ट्रेंडिंग आहे.

OYO चे मालक रितेश अगरवाल यांनी माफी मागावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

खरंतर हे सर्व OYO च्या त्या जाहिरातीमुळे झालं आहे, जी हिंदी वर्तमानपत्रात अर्ध्या पानावर छापली गेली आहे.

OYO च्या या जाहिरातीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर OYO च्या या जाहिरातीला अनेक संस्थांकडून तसेच सर्वसामान्यांकडून विरोध केला जात आहे.

खरं तर, कपल्सना किंवा जोडप्यांना स्वस्तात खोल्या उपलब्ध करून देणारी कंपनी अशी OYO ची ओळख आहे.

मात्र आता कंपनी आपली हीच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरातींवर मोठा खर्च करत आहे.

पण, एका जाहिरातीमुळे त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटा पडतोय की काय अशी चिन्हं दिसू लागली आहेत .

ब्रँडिंगमध्ये बदल

OYO ची ब्रँडिंग स्ट्रॅटेजी आतापर्यंत तरुणांवर केंद्रित होती. आता कंपनीला तिचे ब्रँडिंग ही कुटुंबासाठी अनुकूल

अशी हॉस्पिटॅलिटी चेन म्हणून करायचे आहे. यासाठीच कंपनीने प्रादेशिक चालीरीती आणि श्रद्धांचा

आदर करण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी बुकिंग घेण्यास आणि अविवाहित जोडप्यांना रूम देण्यास नकार दिला आहे.

पण, त्यांच्या एका जाहिरातीमुळे या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची शक्यता दिसत आहे.

काय आहे जाहिरात ?हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली टॅगलाइन आहे,

“देव सर्वत्र आहे” “आणि OYO सुद्धा” असं त्या खाली लिहीण्यात आलं आहे. खरंतर, कंपनीला

OYO च्या व्यापक उपस्थितीचा प्रचार करायचा होता. पण देवासोबत केलेली ही तुलना अनेक

हिंदू समूहांना आवडली नाही. यामुळे आपल्या धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचे सांगत त्यांनी विरोध सुरू केला आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/akola-taluka-krishi-office-spirit-krishi-salgar-samiti-meeting/

 

 

 

Related News