माहूर–नांदेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे घडलेल्या दुहेरी महिला हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली होती. दुपारी 20 नोव्हेंबर 2025 रोजी दोन ते तीन वाजेच्या सुमारास दोन महिलांची दागिने लुटून गळा दाबून हत्या करण्यात आली होती. घटना घडताच माहूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवून विविध पथके बोलावून पंचनामा, पुरावे संकलनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली.
दरम्यान, पोलिसांनी मिळवलेल्या सुरागांवरून सुरेश दत्ता लिंगनवार (38, रा. सदोबा सावळी, ता. आर्णी, जि. यवतमाळ) आणि त्याचा साथीदार गजानन गंगाराम येरजवार (41) यांनी दोन्ही महिलांचे दागिने लुटून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर सुरेश लिंगनवार हा गंगाजी नगर, सेलू (करंजी), ता. माहूर येथील नातेवाईकांच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला असल्याची माहिती गोपनीय खबरीमार्फत मिळाली. त्यावरून नांदेड पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत सुरेशला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार गजानन येरजवार यालाही गंगाजी नगर, सेलू येथून अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या संदर्भात गु.र. क्र. 191/2025, कलम 103(1), 311, 309(6) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास माहूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास चोपडे करत आहेत.
Related News
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी खळबळ! उमर अब्दुल्ला सरकारविरोधात २४ आमदारांची गुप्त बैठक; मुख्यमंत्री बदलण्याची मागणी?
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना ...
Continue reading
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी! या 5 बँकांमध्ये मिळतेय 7.5% पर्यंत व्याज; 10 हजारांचे 5 वर्षांत होतील इतके रुपये
Tax Saving FD: सुरक्षित गुंतवणुकीसोबतच आयकरात बचत करण्य...
Continue reading
एप्रिल-मे महिन्यात देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार? संजय राऊत यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच...
Continue reading
अमेरिकेत हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक! पत्त्यासारखी कोसळली दोन्ही हेलिकॉप्टर; प्रशिक्षणार्थीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
ओरेगन (अमेरिका) : अमेरिकेच्या ओरेगन राज्यात दोन हेलिकॉप्ट...
Continue reading
भेसळखोरांना मोठा दणका! तुकाराम मुंढेंचा दिवाळीपूर्वी कडक इशारा; 19.69 कोटींचे मसाले जप्त
दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांच्या खरेदीला वेग ...
Continue reading
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा भडका! राजन विचारे संतप्त, पोलिसांना विचारले ५ थेट सवाल
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकर...
Continue reading
विधानपरिषद निवडणूक २०२६: कराळे मास्तरांचा भाजपला मोठा नकार; ३३ हजार मतांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!
नितेश कराळे मास्तर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बोलावलं तरी भाजपमध्ये जाणार नाह...
Continue reading
5 धक्कादायक क्षण! प्री-वेडिंग शूटदरम्यान फुग्यांसोबत हवेत उडाली नवरी; थरारक VIDEO व्हायरल
लग्नाआधी सुंदर आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याची क्रेझ दिवसेंदि...
Continue reading
स्वप्नील जोशीचा VIDEO पाहून चाहते भावूक! मुलांच्या खास सरप्राईजचे 5 सुंदर क्षण व्हायरल
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी सध्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आला आ...
Continue reading
सापाचं विष सोन्यापेक्षा महाग! 1 ग्रॅमच्या किमतीत किती सोनं खरेदी करता येईल? जाणून घ्या धक्कादायक सत्य
सापाचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. साप चावल्यास जीवाला धोका ...
Continue reading
मुक्ताईनगरमध्ये कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई! पुरनाड फाट्याजवळ छापा, आठ जण ताब्यात
महाराष्ट्र ऑटो गॅरेजच्या पाठीमागे सुरू असल्याची माहिती; १ हजार ७९० रुपये रोख, पत्त्...
Continue reading
Barbara Barrie Death: हॉलिवूडला मोठा धक्का! ९५व्या वर्षी ऑस्कर नामांकित अभिनेत्री बार्बरा बॅरी यांचे निधन
१२ वर्षांपासून गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री बार्बरा बॅरी...
Continue reading
या धाडसी आणि वेगवान कारवाईसाठी नांदेड पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, फक्त 12 तासांत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या संपूर्ण मोहिमेत पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील, आणि अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांनी मार्गदर्शन केले.
अभियानात सहभागी पथकात स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वागळे,पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे,
पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव करले,पोलीस हेडकॉन्स्टेबल दारासिंग राठोड,मोहन हाके,ज्ञानोबा कवठेकर,देविदास चव्हाण,मोतीराम पवार,सिद्धार्थ सोनसळे,रितेश कुलथे,धम्मा जाधव,
मारुती मुंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक कोठवणेयांचा समावेश होता.
पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून नांदेड पोलिसांचा दहशतवाद, गुन्हेगारीविरुद्धचा धडाकेबाज पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/top-100-cities-2025-worlds-top-100-cities-effective-list-released-from-india-or-3-cities-strong-participation/