माहूर–नांदेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे घडलेल्या दुहेरी महिला हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली होती. दुपारी 20 नोव्हेंबर 2025 रोजी दोन ते तीन वाजेच्या सुमारास दोन महिलांची दागिने लुटून गळा दाबून हत्या करण्यात आली होती. घटना घडताच माहूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवून विविध पथके बोलावून पंचनामा, पुरावे संकलनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली.
दरम्यान, पोलिसांनी मिळवलेल्या सुरागांवरून सुरेश दत्ता लिंगनवार (38, रा. सदोबा सावळी, ता. आर्णी, जि. यवतमाळ) आणि त्याचा साथीदार गजानन गंगाराम येरजवार (41) यांनी दोन्ही महिलांचे दागिने लुटून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर सुरेश लिंगनवार हा गंगाजी नगर, सेलू (करंजी), ता. माहूर येथील नातेवाईकांच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला असल्याची माहिती गोपनीय खबरीमार्फत मिळाली. त्यावरून नांदेड पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत सुरेशला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार गजानन येरजवार यालाही गंगाजी नगर, सेलू येथून अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या संदर्भात गु.र. क्र. 191/2025, कलम 103(1), 311, 309(6) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास माहूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास चोपडे करत आहेत.
Related News
वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाच...
Continue reading
“असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही…” – महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चा...
Continue reading
BMC Election Result 2026 : Mumbaiत ठाकरेंचा बुरूज ढासळताच भाजपाची पहिली मोठी प्रतिक्रिया; प्रविण दरेकर काय म्हणाले?
देशाचे आणि राज्याचे लक्ष लागलेल्या Mumb...
Continue reading
जीव जाऊन परत येतोय… मृत्यूशी झुंज देतोय 38 वर्षांचा प्रसिद्ध Cricketर; रुग्णालयातील चित्र बघवेना
अफगाणिस्तान Cricket ला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळव...
Continue reading
एक्झिट पोलची निकालातून एक्झिट! राज्यात धक्कादायक निकाल; Mumbai महापालिकेत नेमकं काय घडतंय?
Mumbai महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अत्यंत चुरशीचे आणि धक...
Continue reading
Maharashtra Municipal Election Result 2026 : राज्यात पुन्हा भाजपची लाट; 29 पैकी 26 Mahapalikaत कमळ फुलण्याकडे वाटचाल
राज्यातील 29 Mahapalika साठी ग...
Continue reading
Mahapalika Election Results 2026 : मनसेपेक्षा AIMIM भारी, भाजपची डबल सेंच्युरी; ठाकरे गट, राष्ट्रवादीला झटका
29 महापालिकांच्या निकालांत भाजपचा दबदबा; फडणवीस फॅक्टर ठरला निर्णायक, ...
Continue reading
मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही…; Tejaswini पंडितच्या पोस्टची महापालिका निवडणुकीत जोरदार चर्चा
‘आजचं मत मराठी माणसासाठी’; अभिनेत्रीच्या स्पष्ट भूमिकेने मतदानाच्या शाईवर आणि लो...
Continue reading
मित्रांसोबत Party साठी आला अन् मृतावस्थेत सापडला; ग्रेटर नोएडातील हायराईज सोसायटीत खळबळ
20 वर्षीय तरुणाचा बाल्कनीत संशयास्पद मृत्यू; आत्महत्या, अपघात की हत्या? पोलिसांचा बहुकोनी त...
Continue reading
खामगाव – शहरात पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या धारदार मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जलंब नाका परिसरात आज मंगळवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमार...
Continue reading
Transgenderशी प्रेम, लग्न आणि नंतर थरारक कट… बिहारमधील विनोद साह हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा
Continue reading
Gwalior ब्लाइंड मर्डर प्रकरण: एका ऑम्लेटमुळे उघडला खुनाचा कट
Gwalior मधील एका ब्लाइंड मर्डर प्रकरणाने संपूर्ण राज्याला धक्का दिला आहे. एका तरुण महिलेच...
Continue reading
या धाडसी आणि वेगवान कारवाईसाठी नांदेड पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, फक्त 12 तासांत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या संपूर्ण मोहिमेत पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील, आणि अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांनी मार्गदर्शन केले.
अभियानात सहभागी पथकात स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वागळे,पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे,
पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव करले,पोलीस हेडकॉन्स्टेबल दारासिंग राठोड,मोहन हाके,ज्ञानोबा कवठेकर,देविदास चव्हाण,मोतीराम पवार,सिद्धार्थ सोनसळे,रितेश कुलथे,धम्मा जाधव,
मारुती मुंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक कोठवणेयांचा समावेश होता.
पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून नांदेड पोलिसांचा दहशतवाद, गुन्हेगारीविरुद्धचा धडाकेबाज पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/top-100-cities-2025-worlds-top-100-cities-effective-list-released-from-india-or-3-cities-strong-participation/