बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?

बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?

अकोला प्रतिनिधी |

बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे सोमवारी रात्री उशिरा शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत वादाला उधाण आले.

Related News

काही वेळाने वाद इतका चिघळला की किरकोळ प्रमाणात दगडफेकही झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी एका गटावर गुन्हा दाखल केला असून दुसऱ्या गटाकडून अजून तक्रार नोंदवण्यात आलेली नाही,

ही बाब आता वादाचा मुद्दा ठरतेय. अकोल्यातील एका सामाजिक संघटनेने दुसऱ्या गटाचीही तक्रार घेत न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

सध्या याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

पोलिसांनी निष्पक्ष आणि दोन्ही गटांची बाजू ऐकून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/balapur-breaking-manarkhed-darododa-episode/

Related News