बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

अकोट | प्रतिनिधी

बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या

नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाण्यामुळे

Related News

संपूर्ण लेंडीपुरा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डास-मच्छर वाढल्याने साथीचे आजार पसरत आहेत.

नाल्यांमध्ये कचरा व गाळ तुंबल्यामुळे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचत आहे. परिणामी,

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी व डबक्यांची निर्मिती झाली असून वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

डबक्यांमुळे वाहनांमधून पाणी उडाल्यास वाद होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

ग्रामस्थांची लेखी मागणी, रास्ता रोकोचा इशारा

या सांडपाण्याच्या समस्येबाबत अखंड लेंडीपुरा वाशीयांनी ग्रामपंचायत सचिव यांना लेखी निवेदन दिले आहे.

सांडपाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अन्यथा रस्त्यावर

रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

शिवपुर यात्रा आणि वाहतुकीवर परिणाम

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिवपुरच्या चैनुजी महाराज यात्रेची तयारी सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरून शिवपूर, बोर्डी, राहणापूर, कासोद, रामापूर, धारुळ या गावांची

दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. सांडपाण्यामुळे या यात्रेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया

“नालेसफाईचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. साचलेले सांडपाणी दूर करण्यासाठी योग्य त्या

उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुख्य रस्ता असल्याने यासाठी ग्रामपंचायतीमार्फत

वेळोवेळी पाठपुरावा केला गेला आहे. लवकरच रस्त्याच्या कामालाही सुरुवात होईल.”

— अनंत मोहोकार, सचिव, ग्रामपंचायत बोर्डी

Read Also :  https://ajinkyabharat.com/inzori-maa-mandat-200-ekranwar-dubar-peranich-crisis/

Related News