लिडर ग्रुप फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

लिडर ग्रुप

अकोला शहरात लिडर ग्रुप फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना अर्पण केली. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचा देखील सक्रिय सहभाग दिसून आला.

रक्तदान शिबिराचे आयोजन समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिवजयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारखा उपक्रम राबवून शिवरायांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या शिबिरात लिडर ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद शिरसाट, उपाध्यक्ष मंगेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष निलेश बहिर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणव इंगळे यांच्यासह सुनील उईके, रोशन बहेर, गोलू उईके, अनिकेत बोदडे, हर्षुल शिवणकर, चेतन मेंगे, अवि तेलगोटे, भारत मानकर, सुनील घोलप, विशाल सुर्वे, हर्षल खंडारे, महिद्रे उईके, योगेश सोळंके, राज वानखडे, रोशन शिव, तन्मय शिंदे, गोपाल मरवाल, शुभम जाधव, सागर उईके, ओम लकेश्वर, रोहित जोशी, कार्तिक प्रधान, अभय सुरळकर, करण बंगाले, रेखा बावणे, जयेश उगले, भास्कर बावणे आदी रक्तदाते उपस्थित होते.

Related News

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

read also :  https://ajinkyabharat.com/huge-fire-in-usachya-shetaat-huge-loss-due-to-short-circuit/

Related News