अकोला महापालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाचा दणदणीत विजय; चारही उमेदवार विजयी

प्रभाग

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. या प्रभागातून विद्या खंडारे (प्रभाग अ), जयत मसने (प्रभाग ब), रश्मी अवचार (प्रभाग क) आणि विजय अग्रवाल (प्रभाग ड) हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.

या विजयामुळे अकोला शहरातील भाजपाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रभागात जल्लोष करत समर्थकांनी आनंद साजरा केला.

READ ALSO :  https://ajinkyabharat.com/all-4-bjp-candidates-have-won-in-akola-municipal-corporation-division-number-6/

Related News

Related News