अकोट तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या वडिलांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोपटखेड मार्गावरील चौकाजवळ ही घटना घडली.
मृत व्यक्तीचे नाव मधुकर डोमाजी मेसकर (वय ५८, रा. ब्राह्मणवाडा, जि. अमरावती) असे आहे. तर जखमी पुतण्याचे नाव नेहल मेसकर (वय २२) असे असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर मेसकर आणि त्यांचा पुतण्या हे अकोट तालुक्यातील अकोलखेड येथे एका नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. मेसकर यांच्या मुलीचे लग्न अवघ्या १५ दिवसांवर आले असल्याने ते नातेवाईकांना लग्नपत्रिका देत होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दोघे दुचाकीवरून पोपटखेड मार्गे अकोटकडे निघाले होते.
Related News
अकोल्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; धमकीच्या फोननंतर घडली धक्कादायक घटना , 5 मिनिटांत संपलं आयुष्य!
अकोला शिक्षक बदली घोटाळा: 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली | 136 दोषींवर मोठी कारवाई
अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; राजकारणात मोठी खळबळ
धक्कादायक! ५ महिन्यांच्या प्रेमविवाहाचा भयावह शेवट; ‘पप्पा, माझ्या जीवाला धोका आहे’ म्हणत अखेरचा कॉल, CCTV बंद करून तरुणीचा खून?
POCSO आरोपीचा भयावह खूनी खेळ; संपूर्ण Timeline उघड ! 36 मिनिटांत 6 जणांचा थरारक खून!
36 तासांत धक्कादायक खुलासा! नवऱ्याच्या खुनाचा बनाव करणारी पत्नी आणि प्रियकर अटकेत; पोलिसांनी उलगडलं भयावह सत्य
3 दिवसांनी घेतला रक्तरंजित बदला! फुटबॉल सामन्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात प्रचंड तणाव
11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूतील 5 धक्कादायक खुलासे; PM रिपोर्टने उघड केला हत्येचा थरार
धक्कादायक खुलासा! ११ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार; ६ महिन्यांची गर्भधारणा उघड, आरोपी परदेशात फरार
नागपूर : 1 लाखांच्या सुपारीतून पतीची हत्या; नागपूर पोलिसांनी उघड केला थरारक कट, 4 आरोपी जेरबंद
काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगची धमकी; ‘बाबा सिद्दीकींसारखा गेम करू’ ; 10 कोटींच्या खंडणीची धमकी!
अंजनगाव सुर्जी Assault Case: 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड; मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलेवरील अत्याचारप्रकरणी आरोपी अटकेत
दरम्यान, शहराजवळील चौकात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक-टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मधुकर मेसकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून अकोट शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच वडिलांवर काळाचा घाला आल्याने मेसकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
