मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं
आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन
देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागरिकांना
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
न्याय मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांना अनेकवेळा केली आहे,
असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर
निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र
सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे.
काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं
माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा
प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू
देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांवर जनतेने प्रेम आणि
विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे. त्याची ही पोहोचपावती
आहे. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे एक हक्काचा माणूस म्हणून बघितलं जातं,
पण जरी वेगळा पक्ष असला तरी आणखी एक आपला हक्काचा माणूस आहे,
ते म्हणजे नितीन गडकरी. तसेच बारामतीचा जागा कुठला पक्ष लढवणार हे अजून
निश्चित झालेलं नाहीय. गणेशोत्सवानंतर यावर चर्चा होईल. कोण-किती जागा लढवणार,
यावर निर्णय झाला आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/stop-land-acquisition-of-bhaktipeeth-and-industrial-highways/