निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पाहून पोटात येईल गोळा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1.30 वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने एका जागेवर विजय आणि 240 जागांवर आघाडी घेतली आहे.
काँग्रेस पक्ष 96 जागांवर आघाडीवर आहे.
Related News
समाजवादी पक्ष 36 जागांवर तर तृणमूल काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे.
त्या पाठोपाठ डीएमके 21 तर डीटीपी 16 जागांवर आघाडीवर आहे.
हा ट्रेंड असला तरी साधारण वरील नंबरमध्ये फार मोठा फरक पडण्याची शक्यता कमी आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 370 जागांचे टार्गेट ठेवले होते.
तर एनडीए आघाडीला 400च्या पुढे जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता.
सध्याच्या ट्रेंड नुसार भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल का याबाबत शंका वाटत आहे.
\लोकसभेच्या 543 जागांपैकी बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता असते.
अशात सध्या भाजपच्या जागा पाहता त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी अजून 31 जागांची गरज लागणार आहे.
तसेच झाले नाही तर मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागेल.
विशेष म्हणजे 2014 साली जेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मोदींनी जेव्हा पराभव केला होता तेव्हा भाजपलने स्वबळावर 282 जागा जिंकल्या होत्या.
म्हणजे बहुमतापेक्षा त्यांच्याकडे 10 जागा जास्त होत्या. 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकत नवा विक्रम केला होता. आता 2024 मध्ये भाजपला मोठा सेट बॅक बसल्याचे दिसते.
भाजपने संपूर्ण देशात 441 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांना सध्याच्या ट्रेंडनुसार फक्त 242 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.
या उटल काँग्रेसने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसते. 2014 साली काँग्रेसला फक्त 44 जागा मिळवता आल्या होत्या.
त्यांनी 2009च्या तुलनेत 162 जागा गमावल्या होत्या. 2019 साली यात फार सुधारणा झाली नाही. काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या होत्या.
आता मात्र काँग्रेस शतकाच्या जवळ पोहोचेल असे चित्र दिसत आहे. या सोबत भाजप विरोधातील इंडिया आघाडीतील पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे.
यात उत्तर प्रदेशमध्ये सपाने 36 जागांवर आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचा सध्याचा ट्रेंड पाहता भाजपचे 370 जागांचे टार्गेट तर सोडाच पण त्यांना साधे बहूमत देखील मिळेल का याबाबत शंका वाटते.
तसेच एनडीए आघाडीला 400 जागा मिळतील हे देखील शक्य होईल असे दिसत नाही.
कारण एनडीएतील मित्र पक्ष मिळून 350 जागा देखील होणार नाही असा सध्याचा ट्रेंड आहे.
एकूण गेल्या दोन निवडणुकीत कमकूवत झालेला विरोधी पक्षांना अधिक ताकद मिळाल्याचे दिसते.
Also Read: https://ajinkyabharat.com/nitishkumar-chandrababu-naidu-will-become-kingmaker/