पाटणा | 27 जून 2025
बिहारमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाच्या महागठबंधनात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
AIMIM चे नेते राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या नेत्यांशी संपर्कात असून,
संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
AIMIM चे राष्ट्रीय प्रवक्ते आदिल हसन यांनी म्हटले की,
“आमची विचारधारा भाजपाला हरवण्याची आणि बिहारला मजबूत करण्याची आहे.
आम्ही महागठबंधनात सहभागी होण्यास इच्छुक आहोत.”
2020 मध्ये AIMIM ने 5 जागा जिंकल्या
पार्टीने मागील विधानसभा निवडणुकीत सीमांचल भागातील 5 जागांवर विजय मिळवला होता.
या वेळी पक्ष 50 हून अधिक जागांवर लढण्याची तयारी दर्शवत आहे,
पण महागठबंधनात सामील झाल्यास जागांची संख्या कमी करण्यासही तयार असल्याचे AIMIM ने म्हटले आहे.
अधिकृत युती अजून निश्चित नाही
सध्या अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा किंवा युती झाली नसली,
तरीही दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत.
RJD, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महागठबंधनात
AIMIM सामील झाल्यास निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये निवडणुका होणार असून,
मुख्य लढत एनडीए आणि महागठबंधन यांच्यात होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/coronacha-nava-dhoka/