बिहार: 43 आयएएस अधिकारी तर 12 जिल्ह्यांच्या डीएमच्या बदल्या

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने अनेक आयएएस

अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये अनेक जिल्ह्यांचे

डीएम बदलण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये भोजपूर, शिवहर,

Related News

जमुई, लखीसराय, रोहतास, अररिया, समस्तीपूर, बेगुसराय,

शेखपुरा, किशनगंज, अरवाल, मधेपुरासह 12 जिल्ह्यांचे डीएम

बदलण्यात आले आहेत. यासोबतच पाटणा, मोतिहारी, शिवहार

आणि गया या चार जिल्ह्यांमध्ये नवीन उपविकास आयुक्त (DDC)

तर कटिहार, पूर्णिया आणि गया या तीन महापालिकांमध्ये

महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोतिहारीचे डीडीसी समीर सौरभ यांना पटनाचे डीडीसी आणि

पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेले वैभव श्रीवास्तव यांना माहिती

आणि जनसंपर्क विभागाचे संचालक बनवण्यात आले आहे.

पाटणाचे डीडीसी तनय सुल्तानिया भोजपूरचे डीएम बनले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/america-japan-and-south-korea-united-against-kim-jong-un/

 

Related News