बिग बॉस मराठी 5 ने तोडले रेटिंगचे सर्व रेकॉर्ड

3.9 TVR

3.9 TVR प्राप्त करून ठरला नंबर एकचा नॉन फिक्शन शो

सध्या महाराष्ट्रामध्ये मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठी सिझन 5 ची

जोरदार चर्चा सुरु आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला हा

Related News

सिझन प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसत आहे. आता बिग बॉस

मराठी सीझन 5 ने टीआरपी रेटिंगचे सर्व रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे.

वीकेंडच्या एपिसोडसाठी शोचा टीआरपी 3.2 वर पोहोचला होता.

आता माहिती मिळत आहे की, हा शो 3.9 टीव्हीआर प्राप्त करून

नंबर एकचा नॉन फिक्शन शो ठरला आहे. मराठी फ्रँचायझीने असे रेटिंग

मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या या सीझनची

सोशल मिडियावर बरीच चर्चा सुरु आहे. त्यात रितेश देशमुख हा शो होस्ट

करत असल्याने, चाहते आतुरतेने नव्या एपिसोडसह विकेंडच्या ‘भाऊचा धक्का’

ची वाट पाहत असतात. असे म्हणता येईल की, रितेश देशमुखच्या शानदार

होस्टिंगमुळे बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे

आणि या रिॲलिटी शोने नवीन उंची गाठली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/state-bank-of-india-branch-in-nandurbar-mahilanchi-chengarachengri/

Related News