Yeh Rishta Kya Kehlata Hai : मायरा से दूर होगा अरमान? कर्जाच्या जाळ्यात अडकणार अभिरा, येणार मोठे वादळ
स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘Yeh Rishta Kya Kehlata Hai ’ सध्या जबरदस्त वळणावर पोहोचली आहे. प्रेक्षकांना आता एकामागून एक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्या आयुष्यात तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा नात्यांची गुंतागुंत वाढताना दिसणार आहे. प्रेम, त्याग, जबाबदाऱ्या आणि पैशांची चणचण या सगळ्याचा मिलाफ म्हणजे येणारे आगामी भाग असणार आहेत.
Yeh Rishta Kya Kehlata Hai : ८ वर्षांनंतर अभिरा-अरमानचा आमना-सामना
Yeh Rishta Kya Kehlata Hai कथेची सुरुवात होते ती मुक्ति आणि मायरा यांच्या शाळेपासून. योगायोगाने दोघींचेही अॅडमिशन एकाच प्रतिष्ठित शाळेत होते. मुक्ति ही अभिराची मुलगी असून, तिच्यासाठी अभिराने आयुष्यभर संघर्ष केला आहे. दुसरीकडे मायरा ही अरमानची मुलगी आहे, जिच्यापासून अरमान आधीच भावनिकदृष्ट्या दूर राहतोय. या एका निर्णयामुळे – म्हणजेच एकाच शाळेत अॅडमिशन – अभिरा आणि अरमान यांच्या वाटा पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
मुक्ति मिळवते ड्रीम स्कूल, पण वाढते टेन्शन
मुक्तिला तिच्या ड्रीम स्कूलमध्ये प्रवेश मिळतो, पण आनंदाच्या या क्षणासोबतच अभिराच्या आयुष्यात चिंता सुरू होते. शाळेची फी, इतर खर्च, हॉस्टेल, पुस्तके, युनिफॉर्म असा सगळा हिशोब केल्यावर एकूण रक्कम जवळपास ७.५० लाख रुपये प्रति वर्ष इतकी होते. हा आकडा ऐकून जानकी काकींचेही धाबे दणाणतात. अभिरासाठी ही रक्कम जमवणं म्हणजे डोंगर सर करण्यासारखं असतं.
Related News
इराणचा प्रिन्स सुलतान एअरबेसवर धक्कादायक हल्ला, अमेरिकन AWACS विमान नष्ट
उत्तर कोरियाने यशस्वी केली सुपर पावर मिसाइल, अमेरिकेचे टेन्शन वाढले
अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा, झावळ्यांची दिंडी झाली ठिकठिकाणी
काळ्या प्लास्टिकच्या डब्यातील जेवण: आरोग्यासाठी घातक, मृत्यूचा धोका?
अमेरिकेने इराणमध्ये पाठवले 3500 सैनिक; युद्धाची शक्यता वाढली
इराण युद्धाचा मोठा फटका: चार दिवसात 7 कंपन्यांचे 1.75 लाख कोटींचे नुकसान
इराण युद्धाचा पाकिस्तानवर फटका; पीआयए उड्डाण थांबवण्याच्या मार्गावर
MI vs KKR: मुंबईने टॉस जिंकला, केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं
इराण युद्धामुळे पाकिस्तानमध्ये उर्जा संकट; स्मार्ट लॉकडाऊनचा धोका
इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसोबत मांडली ‘सशर्त सहमती’ – होर्मुझवर नियंत्रण हवे
महावितरणचा थकबाकीदारांवर ‘हाय व्होल्टेज’ शॉक – नागपूर जिल्ह्यात वीज कट कारवाई
IPL 2026: विराट कोहलीने अनुष्का शर्मा कडे फ्लायिंग किस; व्हायरल व्हिडिओ
अरमानसाठी मायरा, पण दूर होण्याची भीती
दुसरीकडे, अरमानकडे मेहर येते आणि मायरा साठी बेस्ट स्कूलमध्ये अॅडमिशनची व्यवस्था करते. मायरा चं अॅडमिशन पक्कं होताच अरमान खूप खुश होतो. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. मायरा ला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. विद्या याला विरोध करते, पण अरमान आपल्या निर्णयावर ठाम राहतो. मात्र, एकांतात तो कोसळतो. “मी मायरा शिवाय कसं राहणार?” असा प्रश्न त्याला सतावत राहतो. याच टप्प्यावर अरमान आणि मायरा यांच्यातील भावनिक दुरावा अधिक ठळक होतो.
पैशांच्या किल्लतीमुळे अभिराचे अश्रू
अभिरा मात्र दुसऱ्याच आघाडीवर लढत आहे – आर्थिक संघर्षाची. ती मुक्ति साठी पैसे कसे जमवायचे याचा विचार करत असते. अखेर ती मोठ्या व्याजदराने पैसे उधार घेण्याचा निर्णय घेते. या क्षणी ती देवाला आठवते, भूतकाळ आठवते. लहानसहान गोष्टींसाठीही कधी कधी पैसे नसल्यामुळे झालेली फरफट, मुक्ति सोबत घालवलेले कठीण दिवस – सगळं तिच्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
Yeh Rishta Kya Kehlata Hai : डायरीचा फोटो आणि वाढणारी अडचण
याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडते. मुक्ति चा एक मित्र अभिराची डायरी पाहतो आणि त्यातील काही पानांचे फोटो काढतो. या डायरीत अभिराच्या आयुष्याशी, कर्जाशी आणि संघर्षाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी असतात. हा फोटो पुढे कथेचा मोठा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
पोद्दार हाऊसमध्ये वादळ
कथा इथेच थांबत नाही. पोद्दार हाऊसमध्ये सकाळच्या नाश्त्यावर मोठा वाद उफाळतो. कृष, माधवला सांगतो की अरमानला सुनावणं योग्य नव्हतं. यावर तान्या आपलं मत मांडते आणि अरमान व कृष दोघांनाही चुकीचं ठरवते. यामुळे संजय आणि काजल तान्यावर भडकतात. जुने वाद पुन्हा उफाळतात – आठ वर्षांपूर्वी कृषला नोकरी न देता मनोजला ऑफर देण्यात आली होती, याची आठवण काढली जाते. या सगळ्यात काजल दुखावली जाते आणि ती बोलून जाते की अरमान, तिच्या मुलाला म्हणजेच कृषला नेहमी आपल्या मागे नाचवतो. यामुळे घरात तणावाचं वातावरण तयार होतं.
Yeh Rishta Kya Kehlata Hai : मुक्ति घेते मोठा निर्णय, बोलते खोटं
मुक्तिला शाळेची फी कळल्यावर ती हादरते. ती अभिरावर ओझं नको म्हणून शाळेत न जाण्याचा निर्णय घेते. पण अभिरा तिच्या स्वप्नांसाठी धडपडत असते. शेवटी मुक्ति, शाळा टाळण्यासाठी अभिराशी खोटं बोलते. ती शाळेशी संबंधित बनावट बातम्या दाखवते, जेणेकरून अभिरा तिच्यावर विश्वास ठेवेल. अभिरा मात्र स्वतःच्या कामात आणि पैशांच्या गणितात इतकी गुंतलेली असते की तिला हे लक्षातच येत नाही.
मायरा हॉस्टेलकडे, अरमानचा अंतर्गत संघर्ष
मायरा ला हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी सर्वजण समजावतात आणि अखेर ती तयार होते. अरमान तिला मित्राच्या घरी सोडायला जातो, पण मनातली पोकळी अधिकच वाढते. मायरा पासून दूर राहणं त्याच्यासाठी खूप अवघड ठरणार आहे.
आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील:
अभिरा कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडू शकेल का?
मुक्ति चं खोटं कधी उघड होणार?
अरमान आणि मायरा यांचं नातं आणखी दूर जाईल का?
आणि सर्वात महत्त्वाचं – आठ वर्षांनंतर अभिरा आणि अरमान पुन्हा समोरासमोर आल्यावर नेमकं काय घडणार?
‘Yeh Rishta Kya Kehlata Hai’ मध्ये येणाऱ्या या सगळ्या घडामोडी मालिकेला अधिक भावनिक आणि उत्कंठावर्धक बनवणार आहेत. प्रेक्षकांसाठी पुढचे भाग नक्कीच चुकवण्यासारखे नसतील.
