भुजबळ- मुंडेंसह 12 जणांची टीम लक्ष्मण हाकेंच्या भेटीला!

मुंबईत

मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर

आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन

Related News

लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे.

छगन भुजबळ यांच्यासह सहा मंत्री या शिष्टमंडळात असतील.

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसांपासून

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे.

त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.

आम्हाला आरक्षण संविधानाने दिलेले आहे.

मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे,

पण त्यांना आमच्यातून आरक्षण देऊ नये,

अशी मागणी या ओबीसी आंदोलकांनी केली.

ओबीसी उपोषणकर्त्यांना आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे.

थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होईल

यानंतर शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे.

सरकारच्या शिष्टमंडळात सहा वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर

आणि ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा समावेश आहे.

शिष्टमंडळ आधी वडीगोद्री इथे जाऊन आंदोलकांशी चर्चा करेल.

त्यानंतर शिष्टमंडळ पुण्यात जाऊन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणेंची भेट घेईल.

मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आज आंदोलनाच्या 10 व्या दिवशी

हाके आणि वाघमारे उपोषण मागे घेतात का याची उत्सुकता आहे.

भुजबळ यांच्या समवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये

मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे,

मंत्री धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ,

प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, संतोष गायकवाड,

प्रशांत जोशी, अजय पाटणे असणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/positive-traditional-beauty-of-vatpurnima-with-single-women/

Related News