भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला

भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला

प्रतिनिधी । भोपाल

हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी ठरलेल्या आरोपीने १० वर्षांची शिक्षा ऐकताच कोर्टातून पलायन केल्याची घटना

भोपालमधील न्यायालयात घडली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू याने शिक्षा ऐकताना कोर्टरूममधून धूम ठोकली.

Related News

ही घटना न्यायाधीश नीलू संजीव श्रृंगीऋषी यांच्या कोर्टात घडली. आरोपीच्या पलायनामुळे कोर्ट परिसरात खळबळ उडाली असून,

एमपी नगर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील असा:

ही घटना ३ एप्रिल २०२१ रोजी कालीबाडी बरखेड़ा परिसरात घडली होती.

शाहरुख खान या व्यक्तीवर फक्त ₹१००० रुपयांच्या वादातून टिंगू

आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. शाहरुख गंभीर जखमी झाला होता.

मात्र साक्षांअभावी टिंगूचा साथीदार राजा खान निर्दोष ठरवण्यात आला.

आता टिंगूचा कोर्टातून पळ काढणं, न्यायप्रणाली आणि पोलिस यंत्रणेपुढे मोठं

आव्हान उभं करतंय. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-city-kotwali-polisanchi-action-24-tasant-duchaki-chorte-zerband/

Related News