भिवंडीत भीषण आग! फर्निचरच्या ७ ते ८ गोदामे जळून खाक

भिवंडीत भीषण आग! फर्निचरच्या ७ ते ८ गोदामे जळून खाक

भिवंडी :

राज्यात उष्णतेचा तडाखा वाढत असताना, भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावात

भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या

Related News

गोदामाला आग लागून तब्बल ७ ते ८ गोदामे जळून खाक झाली आहेत.

या आगीमुळे संपूर्ण फर्निचर इमारत आगीच्या भक्षस्थानी आली असून,

धुराचे लोळ तब्बल १५ ते २० किमी अंतरावरूनही दिसत आहेत.

आग लागलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या घटनास्थळी दाखल असून,

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, अद्याप आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे.

विशेष म्हणजे, फर्निचर गोदामाच्या शेजारी मोठे कापडाचे गोदामही आहे,

त्यामुळे आगीचा धोका अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/pahalgam-hallayanantar-akoliyache-31-tourist-sukhupa-lallu/

Related News