व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला आग
मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा
मुंबई : भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना करण्यात आल्या.
अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
भिवंडीत भीषण आग लागण्याची ही घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळ घडली आहे. या आगीच्या घटनेत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता.
आगीमुळे गोदामात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे किती रुपयांचा माल जळाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तसेच आगीचे नेमके कारण देखील अद्याप कळालेले नाही. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.