‘स्त्री 2’ नंतर ‘थामा’ निर्माण करणार भीतीची लाट

या वर्षी असे दिसून आले आहे की हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या आणि स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवले गेले आहेत. आता निर्माता दिनेश विजन यांच्या नेतृत्वाखाली मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या पुढील चित्रपट, ‘थामा’ची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीच्या खास प्रसंगी, थामाचे मोशन पोस्टर देखील स्त्री 2 निर्मात्यांनी शेअर केले आहे. जे पाहिल्यानंतर या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

‘थामा’मध्ये दिसणार हे कलाकार
यावर्षीच्या दिवाळीच्या निमित्ताने मॅडॉक फिल्म्सने थामाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये सुरुवातीला एक रोमँटिक गाणे वाजताना दिसत आहे. पण काही वेळाने पडद्यावर संपूर्ण दहशती दिसत असून मोठ्या फॉन्टमध्ये ‘थामा’ लिहिलेले दिसत आहे. या हॉरर चित्रपटाच्या घोषणेनंतर त्यातील स्टारकास्टचे रहस्यही उघड झाले आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना, रश्मिका मंदान्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल सारखे दिग्गज कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. दिनेश विजन आणि अमर कौशिक या जोडीने याची निर्मिती केली आहे. तर मुंज्यासारखा यशस्वी हॉरर कॉमेडी चित्रपट बनवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोदार यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.