बोरगाव खुर्द येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा..

बोरगाव खुर्द येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा..

पातुर नंदापूर : येथून जवळच असलेल्या बोरगाव खुर्द येथे सम्राट अशोक

नवयुवक मंडळाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष पिंटू चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य असा विजयस्तंभ उभारण्यात आला होता

Related News

आणि500 शूर वीरांना मानवंदना देण्यात आली. गावातील सर्व उपासक उपासिका आणि लहान बालकांनी

सुद्धा पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थिती राहून बुद्ध वंदना देण्यात आली त्यानंतर

भव्य अशा विजय स्तंभाला सर्वांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. गावामध्ये भव्य दिव्य विजयस्तंभ गावातील आकर्षण बनला होता.

सम्राट अशोक मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला बोरगाव खुर्द मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/

Related News