भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीते जाहीर

भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीते जाहीर

जळगाव जामोद | प्रतिनिधी – मंगेश टाकसाळ

महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे वार्षिक भाकीत आज, १ मे रोजी पहाटे सहा वाजता पुंजाजी महाराज

आणि सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. या भविष्यवाणीत देशाच्या राजकीय, आर्थिक, कृषी आणि हवामानविषयक परिस्थितीचे संकेत दिले आहेत.

Related News

शत्रूंची कारवाया सुरूच, पण संरक्षण व्यवस्था ठाम

घटातील मसूर हे धान्य शत्रूचे प्रतीक मानले जाते. मसूर थोड्याशा प्रमाणात दबलेले असल्यामुळे परकीय शत्रूंच्या हालचाली सुरूच राहतील,

असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, करडी धान्य साबूत असल्याने देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत

राहील आणि शत्रू आपले फारसे नुकसान करू शकणार नाहीत, असे भविष्य वर्तवण्यात आले आहे.

राजावर ताण, देशाच्या तिजोरीत खळखळाट

देशावर संकट असल्याचे सूचित करताना, राजा म्हणजेच केंद्र सरकारवर प्रचंड ताण राहील आणि देशाच्या

आर्थिक तिजोरीत खळखळाट जाणवेल, अशी स्पष्ट इशाराही या भाकीतातून देण्यात आली आहे.

पावसाळ्याचा अंदाज: भरपूर पाऊस आणि अवकाळीचे थैमान

  • जून – सामान्य पाऊस

  • जुलै – भरपूर पाऊस

  • ऑगस्ट – सर्वसाधारण पाऊस

  • सप्टेंबर – भरपूर पाऊस व अवकाळी पावसाचा possibility

  • अवकाळी पावसाचे थैमान व नैसर्गिक आपत्तीही शक्य

पिकांवरील अंदाज – काही ठिकाणी चांगले, तर काही ठिकाणी नुकसान

पिकांवर रोगराईचा प्रभाव दिसेल, अवकाळी पावसामुळे नासाडी व उत्पन्नात अनिश्चितता राहील, असे भाकीत केले गेले आहे.

भेंडवळ घटमांडणीतील प्रमुख पीक अंदाज:

पीक अंदाज
कापूस सर्वसाधारण
ज्वारी साधारण, भावात चांगले
सोयाबीन चांगले
तूर साधारण
मूग/उडीद सर्वसाधारण
बाजरी उत्तम
तांदूळ साधारण / भावात तेजी
माठ सर्वसाधारण
गहू साधारण
हरभरा साधारण / भाव कमी
लाख / वाटाणा साधारण / भावात तेजी

भविष्यातील संकटे – युद्धजन्य परिस्थितीचा इशारा

घटामध्ये करव्यावरील पुरी गायब आढळल्यामुळे पृथ्वीवर मोठ्या संकटांचा इशारा देण्यात आला आहे.

या संकटांत युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा समावेश असू शकतो.

शेतकऱ्यांचा मोठा सहभाग

या घटमांडणीच्या कार्यक्रमासाठी विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी उपस्थित होते.

परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हे भविष्यवाण ऐकण्यासाठी गर्दी केली होती.

भेंडवळ घटमांडणीने यावर्षीही अनेक अचूक आणि गंभीर इशारे दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील, मात्र अवकाळी पावसाचा धोका अधिक राहील.

तसेच, देशावर आर्थिक आणि सुरक्षाविषयक आव्हाने कायम राहण्याचे संकेत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/mahinyachaya-suruvatilach-muthi-good-news/

Related News