भारतासाठी फक्त 10 मॅच खेळला

टीम इंडियातून लवकर बाहेर, पण आता कॉमेंट्रीत सुपरहिट

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवता आलं नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेला माजी क्रिकेटपटू आणि सध्या लोकप्रिय कॉमेंटेटर आकाश चोपडा आज (19 सप्टेंबर 2025) आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द फिकी, पण देशांतर्गत झळाळी

आकाश चोपडाचा जन्म 18 सप्टेंबर 1977 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला.

त्याने 2003 साली न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

डेब्यू सामन्यात त्याने पहिल्या डावात 42 व दुसऱ्या डावात 31 धावा केल्या.

पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि नंतर भारतातही तो फ्लॉप ठरला.आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ 10 टेस्ट सामने, 437 धावा, 23 ची सरासरी आणि 2 अर्धशतकांपुरतीच मर्यादित राहिली.

देशांतर्गत व आयपीएलमध्ये चमक

टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 10 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्येही त्याला संधी मिळाली, पण भारतीय संघात पुनरागमन करता आलं नाही.

कॉमेंट्रीतून नवी इनिंग

2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आकाश चोपडाने कॉमेंट्री विश्वात प्रवेश केला.

तो आज भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय कॉमेंटेटरपैकी एक आहे.

त्याचं स्वत:चं यूट्यूब चॅनल असून तिथून तो चांगली कमाई करतो.

त्याच्या विश्लेषणशैलीमुळे त्याला चाहत्यांमध्ये वेगळी लोकप्रियता मिळाली आहे.

संपत्ती आणि पेन्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश चोपडाची एकूण संपत्ती 8 मिलियन डॉलर (सुमारे 70 कोटी रुपये) आहे.

बीसीसीआयकडून त्याला दर महिन्याला 60 हजार रुपये पेन्शन मिळते.

खेळाडू, कॉमेंटेटर आणि विश्लेषक अशा तीन भूमिका पार पाडून त्याने स्वत:ला वेगळं स्थान मिळवलं आहे.

read also :https://ajinkyabharat.com/dr-gopal-bachhire-yanchi-district-dharad-dhaw/