भारताच्या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानचा खवळलेला सूर; युद्धाची भाषा आणि हवाई हद्दीचा बंदी निर्णय

भारताच्या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानचा खवळलेला सूर; युद्धाची भाषा आणि हवाई हद्दीचा बंदी निर्णय

इस्लामाबाद :

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून

एक कठोर निर्णय घेतले. यानंतर आता पाकिस्तानने भारताला उघड धमकी दिली असून,

Related News

भारताने सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा अथवा त्याचे मार्ग वळवण्याचा प्रयत्न केल्यास,

ते थेट युद्धाची कारवाई म्हणून मानले जाईल, असा इशारा दिला आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटी (NSC) ने हा ठराव पारित केला असून,

त्यानुसार भारताकडून होत असलेल्या पाण्याच्या वितरणातील हस्तक्षेप किंवा खालच्या किनारी क्षेत्रातील

अधिकारांवर अतिक्रमण हे पाकिस्तानसाठी असह्य आणि युद्धजन्य कृती समजली जाईल, असे पाकिस्तानच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

भारतीय विमान कंपन्यांना धक्का: पाककडून एअरस्पेस बंद

या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आणखी एक कठोर पाऊल उचलले असून,

भारताच्या सर्व विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द (एअरस्पेस) बंद केली आहे.

हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामुळे भारतीय एअरलाइन्सना

पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करता येणार नाही. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय

उड्डाणांवर आणि त्याच्या वेळापत्रकांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

भारत सरकारच्या पाण्याच्या करार रद्द आणि सीमारेषांवरील हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा हा प्रत्युत्तरात्मक निर्णय,

दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढवणारा आहे. दरम्यान, भारत सरकारने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-social-mediawar-vohiral-jhalela-wideo-khota/

Related News