भारताने हवाई संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ओडिशा किनाऱ्यावरून
स्वदेशी बनावटीच्या इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम (IADWS) म्हणजेच ‘सुदर्शन चक्र’ ची पहिली चाचणी
यशस्वीरीत्या पूर्ण केली.
काय आहे ‘सुदर्शन चक्र’?
‘सुदर्शन चक्र’ ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. तिच्यामध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश आहे.
ही प्रणाली २५०० किलोमीटरपर्यंत शत्रूच्या मिसाइलचा नायनाट करू शकते.
१५० किलोमीटर उंचीवर लक्ष्य पाडण्याची क्षमता आहे.
क्षेपणास्त्र ५ किलोमीटर प्रति सेकंद या प्रचंड वेगाने प्रक्षेपित होऊ शकते.
यात क्विक रिअॅक्शन सर्फेस-टू-एअर मिसाइल, VSHORADS मिसाइल,
आणि लेसर-आधारित ऊर्जा शस्त्र (DEW) यांचा समावेश आहे.
तांत्रिक वैशिष्ट्ये
प्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर आहे, ज्यामुळे शत्रूच्या क्षेपणास्त्रांचे अचूक ट्रॅकिंग करता येते.
यात लेसर-गाईडेड तंत्रज्ञान असून लक्ष्यावर बिनचूक हल्ला करता येतो.
सॅटेलाईट आणि रडार नेटवर्क यामुळे शत्रूच्या बॅलिस्टिक मिसाइल, क्रूज मिसाइल आणि अगदी हायपरसोनिक
शस्त्रांनाही निष्प्रभ करण्याची ताकद आहे.
प्रणाली ग्राउंड-बेस्ड आणि स्पेस-बेस्ड हायब्रिड स्ट्रक्चर वर आधारित आहे.
पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांचे अभिनंदन
रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO शास्त्रज्ञ, सशस्त्र दलं आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की –
“ही यशस्वी चाचणी भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेला नवी दिशा देईल आणि शत्रूच्या हवाई धोक्यांविरुद्ध आपली ताकद वाढवेल.”
तैनाती आणि खर्च
सरकारने ही प्रणाली २०२६ पर्यंत पूर्ण तैनात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यासाठी सुमारे ५०,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अलीकडील यश
याच आठवड्यात भारताने आपली अत्याधुनिक बॅलिस्टिक मिसाइल ‘अग्नि-५’ चीही चाचणी यशस्वीरीत्या केली. त्यामुळे भारताची
रणनीतिक व तांत्रिक क्षमता अधिक मजबूत झाली आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/st-pauls-academache/