रिसोड : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
पैनगंगा नदीलगतच्या शेतशिवारात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, खरिपाचा हंगाम हुकल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले
आहेत.बाळखेडा, वाकद, महागाव यासह अनेक गावांतील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर तिसऱ्या पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे.
Related News
त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड, वाकद, शेलू खडसे या
भागातील नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली.
विशेष म्हणजे, बाळखेड गावात भरणे यांनी थेट शेतकऱ्याच्या दुचाकीवर बसून भर पावसातच शेताची पाहणी केली.
पिके पूर्णपणे वाहून गेल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर देत म्हटले की, “सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” तसेच,
प्रशासनाला त्वरीत पंचनामे करून मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/yuria-sankarvar-swabhimani-shetkari-sangatnecha-hallabol/