बीअरच्या बाटलीने ३६ वार:

बुरहानपूरमध्ये पतीची निर्घृण हत्या; १७ वर्षांची पत्नी, प्रियकर व मित्रांकडून बीअरच्या बाटलीने ३६ वार

बुरहानपूर (मध्यप्रदेश) –

येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,

अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने

Related News

आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणावर तुटलेल्या बीयरच्या बाटलीने

तब्बल ३६ वार करून त्याचा खून करण्यात आला.

या गुन्ह्यानंतर आरोपी मुलीने आपल्या प्रियकराला व्हिडीओ

कॉल करून पतीचा मृतदेह दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

प्राथमिक तपासात या हत्येमागे अवैध संबंध व नवऱ्यापासून सुटका करून

नवे नाते सुरू करण्याचा हेतू असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही घटना समोर आल्यानंतर बुरहानपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/ambajogayat-vakil-women-bal-tali-eki-katacha/

Related News