Beed jail beating case: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले. या प्रकरणाची
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी महादेव गित्ते याने केली.
त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे.
Related News
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूरी शेतशिवारात शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात
जाणूनबुजून तणनाशक फवारून सव्वा एकरावरील सोयाबीन पीक नष्ट केल्याची घटना घडली आहे.
या प्रकर...
Continue reading
अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला
राज्यातील परमिटरुम बार वर राज्यशासनाने १०% वॅट टॅक्स वाढ आणि एक्साईज ड...
Continue reading
विधान सभेचे अध्यक्ष आरोपींना ऍडजेस्ट झाले असल्याचा आरोप UBT चे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहेय.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटवर असलेल...
Continue reading
बिहारमध्ये 'बिहार बंद' दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचार वॅनमध्ये कन्हैया कुमार आणि पप्पू यादव
यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्...
Continue reading
आयुष्मान भारत योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळतो.
सीएससी केंद्र, pmjay.gov.in किंवा मोबाईल अॅप द्वारे कार्डसाठी अर्ज करता य...
Continue reading
देवरी प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमा ही अध्यात्मिक क्षेत्रातील पवित्र मानले जाते त्यानिमित्तानेश्री सत्यसाई सेवा
समिती सेवा स्वरूपामध्ये पूर्ण जगामध्ये काम कर...
Continue reading
महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र पासून तर मराठवाडा,
पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भात व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ
आता उघड...
Continue reading
सततच्या पावसामुळे अकोला शहरातील भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत...
Continue reading
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
Continue reading
Beed Jail Beating Case: राज्यातील बीड जिल्हा सध्या चर्चेचे केंद्र बनला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपासावरुन राज्यभर रान पेटले होते.
या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराड याला अटक झाली.
त्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींना बीड कारागृहात ठेवण्यात आले होते.
सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली.
बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचे सांगितले जात होते.
परंतु तुरुंग प्रशासनाने कराड अन् घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
मात्र सोनवणे आणि गित्ते यांच्यात मारहाण झाल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर आता महादेव गित्तेसह चार आरोपींनी बीड कारागृहातून हलवण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
महादेव गित्तेसह चार आरोपींना बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरमधील
हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी ९.३० वाजता मारहाणीचा झालेल्या प्रकरणानंतर
तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला. मकोकातील आरोपी आणि इतर आरोपी नाश्त्याच्या वेळी एकत्र आले.
दोन गट आमनेसामने आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.
सोनवणे गट आणि महादेव गित्ते यांच्या गटात ही मारहाण झाली.
परंतु वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली नाही,
असे तुरुंग प्रशासनाने पत्र काढून स्पष्ट केले आहे.
या दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
महादेव गित्तेचा थेट कराडवर आरोप
कारागृहातून महादेव गित्ते याला छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात नेण्यात येत होते.
त्यावेळी पोलीस बंदोबस्तात असलेल्या महादेव गित्ते याने माध्यमांशी संवाद साधला.
जोरजोरात बोलत तो म्हणाला, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले.
या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी त्याने केली.
दरम्यान, या प्रकरणानंतर बीडमधील कारागृहात सर्वच काही सुरळीत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संतोष देशमुख हत्येतील आरोपी बीड कारागृहात असलेल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे.