Beed jail beating case: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले. या प्रकरणाची
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी महादेव गित्ते याने केली.
त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे.
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
Beed Jail Beating Case: राज्यातील बीड जिल्हा सध्या चर्चेचे केंद्र बनला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपासावरुन राज्यभर रान पेटले होते.
या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराड याला अटक झाली.
त्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींना बीड कारागृहात ठेवण्यात आले होते.
सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली.
बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचे सांगितले जात होते.
परंतु तुरुंग प्रशासनाने कराड अन् घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
मात्र सोनवणे आणि गित्ते यांच्यात मारहाण झाल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर आता महादेव गित्तेसह चार आरोपींनी बीड कारागृहातून हलवण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
महादेव गित्तेसह चार आरोपींना बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरमधील
हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी ९.३० वाजता मारहाणीचा झालेल्या प्रकरणानंतर
तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला. मकोकातील आरोपी आणि इतर आरोपी नाश्त्याच्या वेळी एकत्र आले.
दोन गट आमनेसामने आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.
सोनवणे गट आणि महादेव गित्ते यांच्या गटात ही मारहाण झाली.
परंतु वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली नाही,
असे तुरुंग प्रशासनाने पत्र काढून स्पष्ट केले आहे.
या दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
महादेव गित्तेचा थेट कराडवर आरोप
कारागृहातून महादेव गित्ते याला छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात नेण्यात येत होते.
त्यावेळी पोलीस बंदोबस्तात असलेल्या महादेव गित्ते याने माध्यमांशी संवाद साधला.
जोरजोरात बोलत तो म्हणाला, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले.
या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी त्याने केली.
दरम्यान, या प्रकरणानंतर बीडमधील कारागृहात सर्वच काही सुरळीत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संतोष देशमुख हत्येतील आरोपी बीड कारागृहात असलेल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे.