बाळापूर-अकोला रोडवरील कोलकाता हॉटेल समोर धावत्या खाजगी बसला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.२२) दुपारी १२ वाजता घडली.
मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
पुणेहून अकोल्याकडे येणारी लक्झरी बस (क्रमांक एमएच ०९ बीई ६३००) प्रवाशांसह जात असताना अचानक इंजिनमध्ये बिघाड होऊन मागील टायरजवळून धूर निघू लागला.
ही बाब आरशातून लक्षात आल्यानंतर चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली व सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरवले.
घटनेदरम्यान पोळा सणाचा उत्साह सुरू असतानाच प्रवाशांमध्ये काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु योग्य वेळी चालकाने घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली.
