बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक

बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक

बार्शीटाकळी | प्रतिनिधी

बार्शीटाकळी येथे दिनांक ३ जुलै रोजी गुरुवारी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/

लभाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत तालुका स्तर समिती क्र. १ व समिती

Related News

क्र. २ यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करण्यात आल्या. समिती क्र. १ च्या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश वझीरे होते,

तर समिती क्र. २ ची सभा गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य पवन विलास जाधव (कातखेड),

मनोज बंडुजी जाधव (रेडवा), सुनील राठोड (झोडगा), पप्पू उर्फ प्रमोद चव्हाण (दगडपारवा),

तसेच गोपाल चव्हाण (जिल्हा समिती अशासकीय सदस्य) यांच्यासह के.एस. इंगळे (सहाय्यक गटविकास अधिकारी व सदस्य सचिव),

श्रीमती अनिता भगत (उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग),

अविनाश थोपे (ग्रामपंचायत अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या

शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले तसेच उपस्थित सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ७०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देणे व ग्रामपंचायत स्थापनेसाठी पात्र

तांड्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासंदर्भात चर्चा झाली.

तसंच, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या तांड्यांना प्राधान्याने विकासकामे देण्याबाबत विशेष चर्चा झाली.

तांड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले.

Read Also :  https://ajinkyabharat.com/jastagavatiyal-shetkyancha-telhara-tehsil-morcha/

Related News