बार्शीटाकळी तालुक्यात भाजपला जबर धक्का

ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांचा वंचितमध्ये प्रवेश
अकोला : मुर्तीजापुर मतदार संघात आधीच भाजपच्या उमेदवाराबद्दल नाराजीचे वातावरण असताना, आज भाजपला आणखी एक जबर धक्का बसला. बार्शीटाकळी तालुक्यातील
भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांनी थेट वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आहे. एकंदरीत मुर्तीजापुर मतदार संघात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याचे यावरून सिद्ध होते.
मनोज जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतल्याने बार्शीटाकळी तालुक्यात वंचितला एक प्रगल्भ राजकीय कार्यकर्ता लाभला आहे. त्यांचा प्रचंड जनसंपर्क व दांडगा अनुभव वंचित आघाडी साठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी वंचित मध्ये प्रवेश घेतल्याने विधानसभेच्या निवडणुकीत बार्शीटाकळी तालुक्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टीला बार्शीटाकळी तालुक्यात गावा गावात पोहोचविण्यासाठी मनोज जाधव यांनी जिवाचे रान केले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे विकासात्मक धोरण त्यांना आवडले. वंचितच्या ध्येयधोरणांनी प्रभावित होऊन त्यांनी भाजपला रामराम ठोकला. मनोज जाधव हे तांडा सुधार समिती अशासकीय सदस्य व पं. स. बार्शीटाकळी उपसभापती संगीताताई जाधव यांचे पती आहेत. मनोज जाधव यांचा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश पार पडला यावेळी माजी सरपंच अशोक भाऊ लोनाग्रे, प्रदीप भाऊ शिरसाट, तिक्ष्णगत वाघमारे, माजी तालुकध्यक्ष युवक आघाडी अमोल जामनिक, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, शंभू सेना तालुकाध्यक्ष सचिन आगाशे उपस्थित होते.