बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान

बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान

बार्शीटाकळी (अकोला) | प्रतिनिधी

बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गावाच्या कन्येने संपूर्ण देशाचा अभिमान वाढविला आहे.

प्राची सुनील गर्गे हिने केनिया येथील नैरोबी शहरात २२ ते २८ जून दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय

Related News

ज्युनिअर अंडर-१७ रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाचे नेतृत्व करत सुवर्णपदक जिंकले.

या स्पर्धेत तब्बल १२ देश सहभागी झाले होते. प्राची ही अकोला जिल्हा रोलबॉल असोसिएशनयंग विंग रोलबॉल अँड

फिटनेस क्लब तर्फे सातत्याने खेळत असून, गेल्या सहा वर्षांपासून तिने या खेळात मेहनत घेतली आहे.

तिने आतापर्यंत सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवून अनेक पदकं व गौरव मिळवले आहेत.

या आंतरराष्ट्रीय यशानंतर प्राचीने केनियात भारताचा तिरंगा फडकवून देशाचा नावलौकिक वाढवला आहे.

तिच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल चिंचोली ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभा दरम्यान प्राचीचा जाहीर सत्कार करण्यात आला.

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला.

प्राची गर्गे – “भारताचं नेतृत्व करणं आणि तिरंगा फडकवणं हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वोच्च क्षण होता.

Read Also : https://ajinkyabharat.com/gurupaularnemela-shindenchi-delhi-vari-shahanchaya-charananwar-tika-sanjay-rautancha-hallabol/

Related News