बलुचिस्तानकडून पाकिस्तान व चीनला थेट इशारा;

India Pakistan War : नाहीतर आणखी हल्ले करू, बलुचिस्तानकडून पाकिस्तान अन् चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर

बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान

आर्मीने पाकिस्तान आणि चीनला थेट इशारा दिला आहे. “पाकिस्तानने बलुचिस्तानमधून सैन्य हटवावे

Related News

आणि चीनने बीआरआय प्रकल्पाचे काम थांबवावे, अन्यथा आम्हाला हल्ले

करण्यावाचून पर्याय उरणार नाही,” असा इशारा या गटांनी दिला आहे.

बलुचिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ग्वादर पोर्टवर चीन आणि पाकिस्तानला नियंत्रण मिळवू देणार नाही.

त्याचबरोबर बीआरआय (बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह) प्रकल्पाचा तीव्र विरोध करण्यात येत असून,

त्या अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने अलीकडच्या काळात पाकिस्तानवर

जोरदार हल्ले केले असून, काही अहवालानुसार त्यांनी प्रदेशातील एक तृतीयांश

भागावर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत असंतोष वाढत

असतानाच या घडामोडींमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही संकट निर्माण झाले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/operation-vermilion/

Related News