बाळापुर, तेल्हारा तालुक्यात पावसाने शेतीचे नुकसान

सर्वे

सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलन

उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचे

Related News

अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची

मशागत सुद्धा करता आली नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटली व काही

ठिकाणी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याबाबत शासन

स्तरावरून कुठलाही सर्वे हा शासनाच्या महसूल अथवा कृषी विभागाने

केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी

शासनाने ताबडतोब सर्वे करावा हा सर्वे न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी

आपापल्या शेतात समाधी आंदोलन करतील असे निवेदन शेतकरी पुत्र

गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात आज बाळापूर तालुका उपविभागीय अधिकारी

व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थितीत होते.

Read also: https://ajinkyabharat.com/north-koreas-kim-jong-un-gives-fashi-education-to-30-officials/

Related News