बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

बाळापूर

परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून

बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी

Related News

शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदुरा,

कारंजा (रम), हाता, अंदुरा, बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण, शिंगोली,

अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिजन, कवठा, बहादुरा, निंबा, वझेगाव,

मोखा, काजिखेड, परिसरात संततधार पावसामुळे

खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे

आदेश जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

सततच्या पावसामुळे शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तिळ आदी

पिकांची नासाडी होत असून कपाशीची पाने झडत असल्याचे दिसत आहे.

याशिवाय शेतात पीक कमी व सार्वत्रिक पाणीच पाणी दिसून येत आहे.

त्यामुळे बाळापूर तालुक्यातील ९० टक्के पिके धोक्यात सापडली असून

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सध्या

हरवलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी

शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहत आहेत.

एकीकडे लालफितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा

सामना करावा लागत असून बाळापूर तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा

अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/akola-katepurna-prakalpat-42-percent-jalsatha/

Related News