बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट, मलकापुर येथे चिमुकल्यांचा रंगीबेरंगी होळी उत्सव

बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट, मलकापुर येथे चिमुकल्यांचा रंगीबेरंगी होळी उत्सव

अकोला, मलकापूर: बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्या बालगोपाळांनी रंगीबेरंगी होळीचा जल्लोष साजरा केला.

पारंपरिक पद्धतीने टिळक लावून, अबीर-गुलाल उधळत विद्यार्थ्यांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या प्रांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related News

विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य आणि खेळांमध्ये भाग घेत आनंद लुटला.

यावेळी शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी होळीच्या पारंपरिक महत्त्वाबद्दल

माहिती घेतली आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.

प्रेम, सौहार्द आणि रंगांचा उत्सव साजरा करत विद्यार्थ्यांनी आनंदाचा सोहळा अनुभवला.

Read more news here :https://ajinkyabharat.com/vicky-kaushal-modanar-katrinachaya-x-boyfriendcha-record-ftkta-pavalam-away/

Related News