बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी राहुल गांधींची घेतली भेट

निवडणुकीच्या

निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसकडून शड्डू ठोकण्याची शक्यता 

भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हरियाणा

विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

Related News

या दोघांचेही तिकीट काँग्रेसकडून जवळपास निश्चित झाले आहे. यापूर्वी

आज विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची

भेट घेतली होती. या बैठकीनंतर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे

आखाड्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग पुनिया हे बदलीमधून निवडणूक

लढवणार आहेत. तर विनेश फोगाट जुलानामधून निवडणूक लढवणार आहेत.

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.

काही दिवसांपासून कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया विधानसभा

निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही निवडणूक लढवणार

असल्याचे आज निश्चित झाले. काँग्रेस एक-दोन दिवसांत हरियाणातील आपल्या

उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने

मंगळवारपर्यंत 90 पैकी 66 जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.

मात्र, नावे जाहीर केलेली नाहीत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. हरियाणातील विधानसभेच्या

90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/big-decision-of-administration-to-remove-st-samp-modun/

Related News