“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एका ‘लोफर’कडे दिली!”

“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एका ‘लोफर’कडे दिली!”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा भाजपला कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती,

तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही एका “लोफर” व्यक्तीच्या हातात दिला, असा संतप्त सवाल राऊतांनी केला आहे.

Related News

“आमदार फुटले, गद्दार झाले, पण बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तुम्ही एका लोफराच्या हाती दिला,”

असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय स्पष्ट इशारा दिला.

“तुम्ही कोण आहात शिवसेनेचे मालक ठरवणारे?”, असा थेट सवाल त्यांनी भाजपला केला.

संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी पार पडणार असून,

त्यात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. राऊतांनी या पुस्तकात नमूद केलं आहे की,

नरेंद्र मोदी गुजरात दंगलीप्रकरणी आणि अमित शाह खून प्रकरणी आरोपी होते. त्या काळात युपीए सरकार होते.

पण त्यावेळी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे दोघांचीही संभाव्य अटक टळली, असा गंभीर दावा त्यांनी केला.

“ही कोणतीतरी मनोहर काल्पनिक गोष्ट नाही, ही सत्यकथा आहे,” असं स्पष्ट करत राऊतांनी दावा केला की,

“माझ्या पुस्तकावर बंदी आणण्याची मला भीती नाही.”

राजकारणातल्या गोपनीय क्षणांचा आणि ठाकरे-पवार यांच्या पाठिंब्याचा उल्लेख करत राऊतांनी भाजपच्या

“कृतघ्नतेवर” प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांच्या पुस्तकातील

दाव्यांवर भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-ncararamade-dhulicha-vinanamatut-wate-khal-khal/

Related News