बेबी येणार आहे, मॅच लवकर संपवा… साक्षी धोनीची चेन्नईच्या मॅचपूर्वीची पोस्ट झाली व्हायरल

बेबी येणार आहे, मॅच लवकर संपवा... साक्षी धोनीची चेन्नईच्या मॅचपूर्वीची पोस्ट झाली व्हायरल

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा सामना सुरु असताना महेंद्रसिंग धोनीची पत्नीhttp://महेंद्रसिंग धोनी साक्षीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये साक्षीने सामना लवकर संपला, असे म्हटले आहे.

रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा सनरायझर्स हैदराबादबरोबर होता. या सामन्यात चेन्नईने ७८ धावांनी मोठी विजय साकारला. ऋतुराज गायकवाडच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तुषार देशपांडेने चार बळी मिळवले आणि चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळेच चेन्नईला हैदराबादच्या संघाला १३४ धावांत ऑल आऊट करता आले आणि मोठा विजय साकारता आला. चेन्नईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. यापूर्वी चेन्नईचा संघ हा सहाव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर चेन्नईचा संघ थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पण या विजयानंतर साक्षीची पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे.

Related News

साक्षीने या पोस्टमध्ये म्हटले होते की, ” चेन्नईच्या संघाने आजचा सामना लवकर संपवावा, कारण बेबी येणार आहे. होणाऱ्या आत्याकडून ही विनंती आहे.” काही जणांना साक्षीच्या पोस्टनंतर धोनीच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचे वाटले होते. पण साक्षीने या पोस्टमध्ये आत्याकडून विनंती असेल म्हटले आहे, त्यामुळे धोनीच्या भावाच्या किंवा मित्राच्या घरी नवीन पाहुणा येणार, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे चेन्नईच्या संघानेही साक्षीची ही गोष्ट ऐकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण चेन्नईच्या संघाने हैदराबादच्या संघाला ऑल आऊट करत हा सामना सात चेंडू लवकर संपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साक्षीची पोस्ट ही जोरदार व्हायरल झाली आहे.

चेन्नईच्या संघासाठी हा विजय महत्वाचा आहे. कारण यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या विजयासह चेन्नईची गाडी रुळावर आली आहे. त्याचबरोबर या विजयासह चेन्नईच्या संघाचे १० गुण झाले आहेत. त्यामुळे आता चेन्नईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीमधील प्रबळ दावेदार असल्याचे समोर येत आहे.

Related News