मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले असून,
पुढील आठवडाभर हवामान अस्थिर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
9 ते 15 मे 2025 या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
कमाल व किमान तापमानात घट होण्याचे संकेत आहेत. बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी,
जालना या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी शेतात उभी पिके जमीनदोस्त केली आहेत.
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून,
मेघगर्जनेसह गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
-
काढणी झालेली हळद योग्य प्रकारे वाळवून सुरक्षित गोदामात साठवावी.
-
उन्हाळी भुईमुगात रसशोषक किडींचा बंदोबस्त करण्यासाठी निंबोळी अर्क किंवा नैसर्गिक कीडनाशकांची फवारणी करावी.
-
केळी, आंबा, द्राक्ष या फळपिकांमध्ये वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या फळगळ रोखण्यासाठी सावली व पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा.
-
द्राक्ष छाटणी पावसाच्या आधीच पूर्ण करावी आणि बागेत योग्य खत व्यवस्थापन करावे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jammu-and-kashmir/