औरंगजेबाच्या समर्थनावरून अबू आझमींविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; अकोल्यात पोस्टरवर शेण फासले

औरंगजेबाच्या समर्थनावरून अबू आझमींविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; अकोल्यात पोस्टरवर शेण फासले

नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

यांना औरंगजेबाच्या समर्थनाचं विधान चांगलंच भोवलं आहे. “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता,”

असं विधान आझमींनी विधिमंडळ परिसरात केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला आहे.

Related News

या वक्तव्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात असून, अकोल्यात

ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी

अबू आझमी यांच्या पोस्टरवर शेण फासून निषेध नोंदवला. तसेच “अबू आझमी मुर्दाबाद” अशा घोषणा देत आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली.

या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून,

अबू आझमी यांच्या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read more news here :https://ajinkyabharat.com/akola-district-illegal-bharwahu-vehhanwar-territorial-transport-department-action-35-vehicle-punitive-action/

Related News