‘औरंगजेबाच्या कबरीचा…’, ‘उदारता, सर्व समावेशकते’चा उल्लेख करत RSS चं राज ठाकरेंना उत्तर

'औरंगजेबाच्या कबरीचा...', 'उदारता, सर्व समावेशकते'चा उल्लेख करत RSS चं राज ठाकरेंना उत्तर

Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांना राज

ठाकरेंनी केलेल्या मागणीवरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या

Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand:औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

Related News

अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाष्य केलं.

यावेळेस त्यांनी या कबरीच्या आजूबाजूची सजावट हटवण्याची मागणी केली आहे.

असं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी या विधानावरुन

आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला.

भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा

संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना,

“भारताच्या उदारतेचं आणि सर्व सामावेशकतेचं हे प्रतीक आहे,” असं मत नोंदवलं.

राज ठाकरे औरंगजेबच्या कबरीबद्दल नेमकं काय म्हणाले?

“औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला

आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला,” असं राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यात म्हटलं.

“मराठ्यांनी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही,

उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते!

शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे जोशींनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला.

माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका.

इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे.

तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात,”

अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी राजकारण्यांचा समाचार घेतला.

Related News