मलकापूर (जि. बुलढाणा): 32 वी मुलं आणि 25 वी मुली वयोगटातील 14 वर्षांच्या राष्ट्रीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. उत्कृष्ट संघभावना, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले.
या विजयी संघाचे नेतृत्व संग्रामपूर तालुक्यातील सोहम राम सावतकार आणि रणजीत नरेंद्र ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी चित्तथरारक चाली आणि कौशल्यपूर्ण खेळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या सुवर्ण विजयामुळे महाराष्ट्र राज्याचा आट्यापाट्या खेळातील गौरव अधिक उजळला असून संग्रामपूर तालुक्यातील नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
read also :https://ajinkyabharat.com/ola-dukh-jaheer-karanyachi-magani/
