ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

बाळापूर: हंगामी पेरणीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे 70 ते 78 टक्के जमीन पाण्याखाली गेल्याने पिके नष्ट झाली असून, शेतकरी आपल्या घरखर्च, कर्ज फेडणी आणि मुलांचे लग्न याबाबत चिंतेत आहेत.

शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई आठ दिवसांत देण्याची मागणी केली आहे. तसेच ही मागणी न मानली गेल्यास हजारो शेतकऱ्यांसह रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जर आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील.

read also :https://ajinkyabharat.com/corruption-selective-role-discussed/