अकोला, दि. ३० : बार्शीटाकळी नजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न चाईल्डलाईन व काही स्वयंसेवी संस्थांच्या सतर्कता व जलद कार्यवाहीमुळे फसला.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीचा विवाह २४ वर्षीय तरुणासोबत होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन, ‘ॲसेस टू जस्टीस’, आय. एस. डब्ल्यू. एस. यांना मिळाली. त्यांच्या टीमने धाडसी कारवाई करत हा विवाह तत्काळ थांबवला.
या घटनेत मुलीचे आधीच्या आधारकार्ड वय १७ वर्ष असताना ते वाढवून बनावट कार्ड तयार केल्याचे आढळले. टीमने तत्काळ पोहोचून पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणले. संबंधितांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बद्दल माहिती देऊन बाल विवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समुपदेशन आणि कडक इशारा देऊन बाल कल्याण समितीसमोर दोन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
अल्पवयीन वयात लग्न झाल्यास मुलीच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दोन्ही बाजूंच्या पालकांकडून “मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न लावणार नाही” अशा आशयाचे कायदेशीर हमीपत्र लिहून घेण्यात आले.
ही यशस्वी कारवाई बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड.अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ.विनय दांदळे, ॲड.शीला तोष्णीवाल, प्रांजली जयस्वाल, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, कम्युनिटी सोशल पूजा मनवर आदींनी केली.
Related News
SpiceJet Employee Ends Life: WhatsApp Status पाहून घरमालक धावला; गूढ कायम
लखनऊ, गोरखपूर: स्पाईसजेटमध्ये सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने आपले जीवन संपवले,...
Continue reading
अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘
Continue reading
अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यकअकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमा...
Continue reading
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील नागरिकांसाठी मोठा इशारा दिला आहे. मार्च महिन्यातही महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारीत प...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
मोठा धक्कादायक समाचार: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक ...
Continue reading
वीज बिलाच्या वसूलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. अकोला परिमंडळात एकूण २८० कोटी रूपयांची थकबाकी असून, त्यातील फक्त ८५ कोटी रूपये वसूल झाले आहेत. ...
Continue reading
Bihar मधील गोपालगंजचा 18 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता, College Student Missing ; आईच्या भावनिक पत्रातून मानसिक त्रास, पोलिस शोध सुरु; संन्...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/new-shocking-truth-revealed-in-rahul-banerjee-death-case/