ATM Fee Hike : आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे.
नवे नियम लवकरच लागू होणार आहेत.
ATM Fee Hike नवी दिल्ली : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक
Related News
हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व...
Continue reading
पुण्यात गर्भवती महिलेचा पैशाअभावी दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप
पुणे: शहरातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला वेळीच उपचार न दि...
Continue reading
आलेगाव, ४ एप्रिल:
शेकापूर फाटा (कार्ला शिवार) येथे असलेल्या कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा,
सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा आणि सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज
यांच्...
Continue reading
दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव
अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची
दिंडी काढून...
Continue reading
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घट...
Continue reading
सोन्याच्या किमतीत 18% वाढ; गुंतवणूकदारांना नफा, पण पुढे दर कोसळणार?
गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून,
सध्या तो ₹90,000 प्रति 10 ग्रॅमच्या व...
Continue reading
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले
आमदार प्रशांत बंब हे शिक्षक विरोधी भूमिकेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेत.
शिक्षक शाळेत शिकवित नाह...
Continue reading
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा चित्रपट
ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काही दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली,
मात्र त्यानंतर प्...
Continue reading
नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत
माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर 'भारतरत्न'
पुरस्काराने सन्मानित कर...
Continue reading
अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात,
अशी जोरदार मागण...
Continue reading
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रा...
Continue reading
शाळेची मधातली सुट्टी झालेली. हळूहळू दुपार टळू लागतेय. सुट्टीमुळे पोरे उनाड वासरासारखी घराकडे पळालेली!
मी निवांतपणे वर्गात बसलेलो असतोय... एवढ्यात मला आठवतंय,
काल आलेले बरेचसे...
Continue reading
ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या
इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचें शुल्क 17 रुपयांवरुन 19 रुपये
करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहेत.
देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे.
एनपीसीआयनं 13 मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय
व्यवहारांसाठी 7 रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे.
याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे.
या संदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या हिंदी वेबसाईटनं दिलं आहे.
एनपीसीआयनं यासंदर्भातील बदल लागू करण्यासाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती.
या संबंधात आरबीआयनं 11 मार्च 2025 ला लिहिलेल्या पत्रात एनपीसीआयला सूचना देण्यात आली होती.
त्यामध्ये एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्क द्वारे निश्चित केल जाऊ शकतं, असं सांगण्यात आलं.
याशिवाय नव्यानं निश्चित करण्यात आलेलं शुल्क लागू करण्यात येण्यासंदर्भातील
तारीख आरबीआयला एनपीसीआयनं कळवावी, असं सांगण्यात आलं आहे.
संशोधित इंटरचेंज शुल्क मायक्रो-एटीएम, इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (कार्ड आधारित आणि यूपीआय आधारित)
आणि आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांवर लागू नसेल. सध्या जे दर आकारले जातात ते कायम असतात.
नेपाळ आणि भूतानमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर शिल्लक
तपासणीवर इंटरचेंज शुल्क 7 रुपये निश्चित करण्यात आलं आहे.
यावर जीएसटी शुल्क आकारलं जात नाही.
एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार सध्या नॅशनल फायनान्शिअल स्विच सदस्यांची संख्या 1349 आहे,
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 1296 इतकी होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये एनएफएस अनुमोदित व्यवहारांची संख्या 31.5 कोटी इतकी होती.
जी फेब्रुवारी 2024 मध्ये 36.5 कोटी होती. यामध्ये वार्षिक आधारावर 13.7 टक्के घसरण झाली.
एनएफएस नेटवर्क नुसार एटीएमची संख्या देशभरात 2.65 लाख इतकी आहे.
मोफत पैसे काढण्याची संख्या कमी होणार
एटीएम कार्ड वापरासंदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत.
समजा एखाद्या बँक खातेदारानं त्याचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम
सेंटरवरुन पैसे काढले ठराविक व्यवहारानंतर शुल्क भरावं लागतं.
सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन 5 वेळा मोफत पैसे काढता येतात.
आता ही संख्या 3 पर्यंत आणली जाणार आहे.लवकरच हा नियम लागू होईल.